Friday, February 15, 2019

प्रेम

काल प्रेमाचा दिवस होता म्हणे, छान आहे. सर्वांनी म्हणजे ज्यांना त्यांची जोडी आहे त्यांनी तो सेलिब्रेट केला असेल, आणि करायलाही हवा. ज्यांना तो करता आला त्यांच्याविषयी आनंद आहे.
   पण अजूनही अपल्यासमजात प्रेमाला समजून घेण्याची लायकी नाहीये काहीजणांची. प्रेम काय असतं हे त्यांना कधीच कळणार नाही ज्यांनी ते केलच नाही किंवा ज्यांनी ते अनुभवलं नाही. प्रेम मित्रांचं मित्रावर्ती, मैत्रिणीच मैत्रिणी वरती, मैत्रिणीच मित्रावरती, आई बाबांचा आपले मुलांवरती,आईच बाबंवरती, आजी आजोबांच आपल्या नातवडांबरोबर, आजी च आजोबांबरोबर, गुरुजींचं विद्यार्थ्यांवर आसे कितीतरी प्रेमाचे नाते आपण सांगू शकतो ते आपल्याला मान्य ही असतं. पण मग ज्यावेळी ते एका मुलीचं आणि एका मुलाचं एकमेकांवरजीवापाड असलेलं हे प्रेम आपल्याला का चालत नाही?
    बरं ठीक आहे , एकवेळ चालताही पण जेंव्हा अपल प्रेम हे दुसऱ्या मुलीबरोबर असलेलं आपल्याला चालत, एका मुलीला आपल्या भावाच प्रेम ही कळत, पण जर किमान त्या भावाने तरी आपल्या बहिणीच्या प्रेमला स्वीकार का करू नये? किंवा त्यांच्या पाठीशी उभा राहून घरच्यांनाही या पवित्र प्रेमाचं महत्त्व का समजावून सांगू नये?
    आणि आई बाबांनी ही आता हे मान्य करायला शिकलं पाहिजे की हा काळ नवीन आहे, आणि या काळात मुलांना आपले निर्णय स्वतः घ्यायला परवानगी द्यायला पाहिजे, आपल्या मुलांच्या प्रेमाचा स्वीकार आपण करायलाच पाहिजे, तरच  ज्या लोकांना पाहून तुम्ही तुमच्या मुलांचे निर्णय घेता त्या लोकांचे विचार बदलणार नाही, आणि काहीच बदलणार नाही. हे खरच आहे बदलाची सुरुवात ही आपल्यापासून चं होते. बाकी आपण समजदार आहातच.
   

Automotive Shock Absorber for Passenger Cars: Market Trends and Innovations by 2032

  Exploring the Automotive Shock Absorber for Passenger Cars Market When you think about your car, you might picture the sleek design, the...