Tuesday, March 1, 2022

Gangubai kathiyawad movie| Gangubai kathiyawad full movie | Gangubai kathiyawad movie review|

गंगुबाई कथियावाड

काल हा movie पाहिला, शेवटपर्यंत हा आपल्याला सतत प्रश्न विचारत असतो, आपल्याला एक आरसा दाखवत जातो. ज्याला तो आरसा दिसू शकतो समजा त्या व्यक्तीपर्यंत हा सिनेमा पोहोचला., आणि ज्यांना फक्त कामाठीपुरा दिसला त्यांनी हा चित्रपट पुनः एकदा पाहायला पाहिजे.

तर मला हा चित्रपट खूप आवडला, direction te acting aani क्लायमॅक्स सर्व काही व्यवस्थित.
तर मी यात काय पाहिलं........., तर पहिली गोष्ट म्हणजे प्रेम, हवस ,गरज, फसवणूक, बळजबरी,नाईलाज,हिम्मत,दृष्टी,आत्मीयता,त्याग, प्रतिकार, न्याय., बांधिलकी, तत्व, अपेक्षा, काळजी, सत्य, आंधळेपणा, अर्धसत्य, समाज, मार्गदर्शक, माणुसकी, दृष्टिकोन, नैतिकता ,सामाजिक दृष्टिकोन,करुणा, दुःख, आणि आपल्या प्रतेकाच वेगळं वेगळं जग, त्या त्या जगतील प्रश्न, त्या प्रत्येक जगतील राजकारण., डावपेच.


बदलतं काय तर, विचार करण्याची पद्धत प्रत्येक पातळीवर...., प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत. आणि लक्षात राहतं तो संवाद , तिचा आणि आई शी बोलताना, ३० सेकंदात कॉल कट होणार असतो आणि याची सूचना प्रत्येक वेळी तिला ऑपरेटर डेट असतो, आणि तिला तेंव्हा समजत तिच्या वडिलांचा मृत्यु झाला आहे. तेंव्हा ती चिडून सतःच मन मोकळं करून बोलते  काय काय बोलू या ३० सेकंदात!!!, २५ वर्षांनी आई शी बोलते आणि खूप काही बोलायचं आहे, माझे बाबा वारले त्या गिष्टिविशयी बोलायचं आहे, इतके वर्ष मी काय सहन केलं ते बोलायचं आहे, आणि हे या ३ सेकंदात कसं बोलू कस आणि तेवढ्यात फोन कट होतो.

त्यानंतर त्या मुलीला तिच्या वडिलांना घरी पत्र लिहायचं असत पहिल्यांदा तेंव्हा , त्यांचा भावना त्यांना येणारी त्यांचा घरच्यान ची आठवण., आणि ते शब्द.

गंगू च्या मैत्रिणीला tb होतो तेंव्हा तिला मारायच्या आधी घरी भेटून यायचं असतं तेंव्हा , ती बोलते घरच्यांनी स्वीकार नाही केला तर तू वापस येऊ शकते इथे आम्ही आहोत तुला शेवटची अग्नी द्यायला.
गंगुबाई एका मुलीला या व्यवसायात येण्यापासून वाचवण्यासाठी तिला घरी सोडून यायला सांगते तो प्रसंग, त्यावेळी आलिया च्या नजरेत दिसणारं तिचा भूतकाळ.

स्वतः प्रेमात असताना वेश्ये सोबत कोणी लग्न नाही करू शकत म्हणून स्वतः हुन आपल्या प्रेमाचा त्याग करून त्या वेश्याच्या मुलीचं आयुष्य चांगल करण्यासाठी स्वतः च्या प्रेमाचा त्याग करून त्या दोघांचं लग्न लावून देणं.

आणि शेवटचं म्हणजे ते आझाद मैदानावरच भाषण., ते ऐकताना दृष्टी पेक्षा दृष्टिकोन किती महत्वाचा आहे हे लक्षात राहतं......

त्यामुळे हा चित्रपट आपण सर्वांनी आपली जुनी दृष्टी बाजूला ठेवून एका नवीन दृष्टिकोनातून हा चित्रपट पाहिला तर नक्कीच तुम्हाला ही हा आरसा सहज दिसेल.

Growth Forecast for Idler Arm Market Opportunities by 2032

  Automotive Brake Valve Market Overview: During this period, the market will gain from factors like rising inclusion of technologies in t...