Friday, May 3, 2019

ती.........


    ती...

she



ही गोष्ट घडली ती ८वित असताना , पहिली आवडती व्यक्ती कळायला 8 वित जावं लागलं होत म्हणजे आठवीत गेल्यावर कोणीतरी आवडायला लागलेलं, कोणाचा तरी स्वभाव आवडायला लागलेल , वाटलेल अरे आपल्यासारखी कोणतरी व्यक्ती आपल्याला भेटलिये ,कदाचित आत्तापर्यंत आपण हीच्यासाठीच थांबलेलो, वाटल की ठीक आहे, सध्या तर आठवीत आहोत अजून बाकी आहे न, नववी आणि दहावी , म्हणून मग ,पहिल्यांदा आठवीत असताना २६ जानेवारीला  वर्ग सजावटीला मी नेहमी वर्ग सजावटीला थांबायचे त्यापेक्षा अर्धा एक तास जास्त थांबलो,कारण आज ती काही वेगळीच होती, कधीही तिच्याकडे न पाहिलेला मी आज तिच्याकडे पाहतच होतो, काय सुंदर रांगोळी काढलेली तिने. खांद्यापर्यंत लांब केस होते तिचे , ते तिला अगदी छान शोभून दिसायचे , डोळ्यात कमालीचा निरागसपणा, आणि आजच पहिल्यांदा एकमेकांशी मोकळेपणे संवाद साधत होतो, आणि मला ही अश्याच मोकळ्या सभावच्या मुलीची प्रतीक्षा होती., तशी ती दिसायला ही छान होती, अगदी  ती व्यक्ती आपल्या येवढ्या जवळ असेल असे वाटले नव्हते, ते तिच्याशी त्यादिवशी निवांत भेटल्यावर जाणवले,  अपेक्षा काही नाही आपल्याला आवडणा्री व्यक्ती आपल्याशी या निमित्ताने का होईना जरा जास्त वेळ बोलेल तेवढीच भोळी भाबडी अपेक्षा .

आणि थोडासा जास्त सहवास लाभेल तेवढंच, सुंदर  क्षण आठवायचा, आणि मग बाकी हळू हळू हि मैत्री वाढत जाईलच की हा आशावाद .पण कधी तर पुढ्याच्या वर्षी नववीत गेल्यावरती. तोपर्यंत या शोट्याषा क्षणांना घेवून मनात साठवून आठवायचा. आणि अश्याप्रकरे शाळेला सुट्या लागल्या , पण ती ची आठवण आणि तो क्षण मनातून जाणे शक्य नव्हते  . यावेळेस शाळेची सुट्टी उशिरा संपावी असे वाटण्यापेक्षा  शाळेच्या सुट्ट्या कधी संपतील याची वाट कॅलेंडर वर तारखा चा बघत बसायचो हा एक नवीन छंदच जणू जडला होता.


     ती तारीख आता जवळ आली होती उद्या शाळा उघडणार होती माझ्यापेक्षा जास्त आनंद बाकी कोणाला झाला असेल . खूप खुश मी, आईला सांगितलं उद्या शाळा चालू होत आहे कपड्यांची इस्त्री करून ठेव, आई पण प्रश्नचिन्ह करून आश्चर्याने  माझ्याकडे पाहत पाहतच होती, आत्तापर्यंत शाळा चालू झाल्यानंतर एक दोन आठवड्यानंतर शाळेत जाण्याचा क्रम एकदाही न मोडलेला माझा मुलगा आज येवढा शहाणा कसकाय झाला, पण याच तिला कौतुक ही वाटला आणि ती ही माझ्या या पहिल्या दिवशीच्या शाळेत जाण्याच्या तयारीत सामील झाली , मी माझी वॉटर बॅटल स्वतः निट साफ केली , टाय व्यवस्थित आडकवून ठेवला जेणेकरून उद्या मला लवकर सापडेल, बूट धुवून पॉलिश करून चकाचक चमकावले ,केस खूप वाढले होते ते ही व्यवस्थित कापून घेतले .. हा मग ती गोड आठवण आणि पहिल्या दिवशी पाहिलं इम्प्रेशन पडायला नको. आमच्या इंग्लिश च्यां सरांनी सांगितलेलं होत 1st day 1St impression is must , आतापर्यंत इंग्लिश च्या सरांच एकही वाक्य मनावर न घेतलेला मी आज हे वाक्य अगदी तंतोतंत पालन करत होतो याच आज इंग्लिश च्यां सरणाही अप्रूप वाटेल.  आणि आज ठरल्याप्रमाणे सर्वं काही टकाटक अवरून शाळेला जायला निघालो , मनात खूप आनंद, खूप उत्साह ,जवळचे मित्र अजून माझाच टाइमटेबल फॉलो करत होते , मनात आणि आनंदात फक्त तिची भेट व्हावी एवढंच होत,


मी शाळेत पोहोचलो माझे डोळे फक्त तिच्या शोधत इकडे तिकडे लांबूनच न्याहाळत होते,  आणि दरवर्षीप्रमाणे  शाळेच्या पहिल्या दिवशी येतात तेवढेच मुल म्हणजे संपूर्ण शाळेत २०ते ३० मुल असाही गावकडे शाळा महिन्यानंतर चालू होते, पण मी अगदी तयारीत वर्गात जाऊन. बसलो तिथे मी आणि ज्यांना घरी काम सांगतात अशी २ ४मुल आणि मुली आले होते ,आणि मझ सांपूर्न लक्ष दरवाज्याकडे तिच्या येण्याची चाहूल कधी लागते याकडे होत, आस वाटत होत की ती कधी येते आणि संपूर्ण वर्गात आधी मला पहाते आणि आगदी नकळत गालातल्या गालात एक स्मित देते....  मग  आम्ही त्या आठवणी पासून बोलायला आणि  नव्या सुंदर नात्याला सुरुवात करू. वेळ जात होता पण तिची ओढ कमी होत नवती आणि ती काही येत नव्हती ,असेच शाळा सुटायची वेळ आली आणि ती काही आली नाही, तर वाटल ठीक आहे पहिल्या दिवशी कोणी येत नसते येईल उद्या असे म्हणून नाराज झालेल्या मनाला धीर दिला स्वतःतील आशावाद जगवला आणि घरी गेलो, उद्या ही असाच घडल ,परवा ही असाच घडला आणि दोन महिन्यानंतर वाट पाहत मी शाळेत असताना तिची वाट रोजच्या सारखीच पाहत असताना तेंव्हाही हेच झालं आता माझा आशावाद थकत चालला होता, तिची आठवण अगदी दाट होत होती.. पण ती काही येत नवती,  मग न राहवून खूप हिम्मत करून तिच्या एका मत्रिनीला विचारलं की अरे ती का येत नाहीये शाळेत. अजून गावावरून आली नाहीये का.


     तर, त्या मैत्रिणीच उत्तर आलं, ती येणार नाही आता शाळेत कारण तिने शाळा सोडली आहे. हे ऐकताच मन अगदी कावर बावर झाला, डोळ्यात आसवांची दाटी होत होती , त्यांना बाहेर न पडू देण्याचा प्रयत्न आणि त्या मैत्रिणीला समजू न देण्यासाठी ओठांवरती उसणी हास्य आणायची तडजोड ,या सर्वांचा काही ताळमेळ बांधता येतो का हे पाहणारी ती मैत्रीण , या परिस्थितीला हाताळत मी  तिच्या समोरून दूर गेलो एका झाडाखाली बसून डोळ्यातील दाटलेल्या पाण्याला वाट मोकळी करून दिली .जर मला ती मनापासून आवडत असेल तर परत कधी तरी कुठे तरी तिची नक्कीच भेट होईल हा आशावाद जिवंत केला आणि कोणत्याही मुलीशी बोलताना ऐवढा जवळचां भावनिक संबंध येणार नाही याची काळजी घेण्याचा नीच्छय केला ... आणि ती भेटेल पुन्हा तेंव्हा तिला नक्की सांगेल .....   


                                                                                                 

                                   पुनः ती

No comments:

Post a Comment

Growth Forecast for Idler Arm Market Opportunities by 2032

  Automotive Brake Valve Market Overview: During this period, the market will gain from factors like rising inclusion of technologies in t...