पुनः ती
कुठून तरी दुरून
अचानक शुभमंगलम् सावधान हा आवाज कानावर पडू लागला आणि सोबतच फटाक्या आणि बँड चां
आवाज आता खूप जवळ जवळ ऐकायला येवू लागला एवढा की माझ्या आणि बाजूलाच वाजत आहे !
डोळ्यांसमोर माणसांची गर्दी जाणवायला लागली आणि जागेवर नसलेले मन अचानक भानावर
आले. आणि ती सुद्धा गर्दीत हरवून गेली, तेंव्हा माझ्या
लक्षात आल की मी लग्नमध्येच आहे. कानावरती आवाज दुरून येत नव्हता तर माझं मन नऊ
वर्षे दूर लहानपणी च्यां जगात हरवलं होत. आणि म्हणूनच तो आवाज मला दूर भासत होता.
जसा जसा मी वास्तवात आलो, तसा तो आवाज खूप स्पष्ट झाला आणि मी परत या जगात या
लग्नमंडपात वापस आलो. पण ज्या मंगल अष्टिका माझ्या कानावर आल्याचं नाही, त्याच कारण होत त्या "अक्षता."
आता तुम्ही
म्हणाल अक्षात आणि मन हरवण्याचा काय संबंध , हो होऊ शकत अस
जेंव्हा तो भूतकाळ तुमच्या समोर उभा असतो. माझ्या हातात अक्षता भेटल्या आणि मी
जिथे कूलर ठेवलेलं होत त्या जागेवर जाऊन बसलो. तिथे कूलर च वार घेण्यासाठी सुद्धा
बरीच गर्दी होती. मग त्या गर्दी ला बाजूला सावरत एका अँगल मध्ये उभा राहिलो. आणि
नजर सहज च पुढे गेली, लग्नकार्यात असं गर्दीत अँगल मध्ये उभ राहील की नजर
चहूबाजूंनी फिरतच असते.तेव्हा मंगल कार्यालयातील सजावट व काही ओळखीचे व अनोळखी
चेहरे समोरून जात असतानाच नजर एका ठिकाणी स्थिरावली. हा..... हुशार आहात तुम्ही , बरोबर ओळखलत. ती स्त्रियांची बसण्याची बाजू होती. पण जरा
दूर चां विचार जवळ आणा आणि थोड आलिकडे या हा थांबा. तीच ती...ती नाही हो हा हा "ती" तीच मुलगी. तिथेच माझीही ही नजर एकवटली आणि लगे फ्लॅशबॅक मध्येच गेलो ते सर्व
मंगलाष्टकं संपेपर्यंत.
हो ती तीच होती.
ओळखणार कसं नाही. तीच लक्ष नव्हतं माझ्याकडे एका बाजूने मीच पाहत होतो. आणि ते
निरागस डोळे जे मी पाहिले होते लहानपणी ते कसे विसरू मी ते तसेच निरागस होते
अजुनही.केसांची ठेवणं ही अगदी तशीच खांद्यापर्यंत. गुलाबी आणि आकाशी रंगांची
मिश्रण असलेला ती तिचा ड्रेस आणि त्यावरती मोरपंखी रंगांच्या फुलांच्या छटा.
तिच्या सोबत तिची मैत्रीण पण होती. तिच्या मैत्रिणीचा धक्का तिच्या हाताला लागला
आणि ती च्या हातातील अक्षता ची पुडी बरोबर मी ज्या अँगल ने तिला न्ह्यहाळत हरवलो
होतो अगदी त्याचं बाजूला पडली. ती पुडी उचलण्यासाठी वळली तेंव्हा ते आत्तापर्यंत
"ती" च्या आठवणीत विसरलो होतो की मी कुठे आहे.
आता जाग आली तर
ती डोळ्यासमोरून गायब , सर्व गर्दी आता पांगली होती कोणी नवरी जवळ फोटो
काढण्याच्या घाईत तर कोणी जेवणाच्या पांगतिकडे जाण्याच्या घाईत.मला तर यावेळेस
दोन्ही पण सुचत नव्हते. फक्त ती एकदा भेटण्याची ओढ आणि बरच काही बोलण्याची
उस्तुकता. आता पुन्हा तिला असं अचानक गायब नव्हतं होऊ द्यायचं होत. म्हणून मग मी
निर्णय घेतला की तील्या भेटल्या शिवाय जेवायचं पण नाही. ती त्या लग्नात होती कारण
आमच्या शाळेतील mutual friend च लग्नं होत.पण
ती अशी अचानक लग्नात येईल हे नव्हतं माहिती.
बोललो होतो
तुम्हाला मी, आशावादी असल की सर्व काही भेटत. आज तेच धीर कमी आला.
आज मी तिला किती - किती वर्षांनी भेटणार होतो, खूप उस्ताही
होतो. आनंदी होतो. ती भेटल्यावर तिच्या शी काय काय बोलायचं हे सर्व आठवत होतो., तर जेवणाची पंगत संपू नये याची काळजी ही होतीच. तिला
भेटण्याची उस्तुक्ता आणि पोटातील भूक दोन्ही गोष्टी एकाच वेळेला शांत बसू देत
नव्हत्या.
पसरलेल्या माणसांच्या गर्दीत माझी नजर फक्त तिलाच शोधत होती. आणि तेव्हढ्यात नजर नवरी जिथे उभी होती त्या स्टेज वरती स्थिरावली. "ती" हो तीच ती. तिच्या हातातील गिफ्ट ती नवरीला द्यायला जात होती. माझ्याजवळ गिफ्ट...? अरे नाही ! विसरलो. माझ्याजवळ गिफ्ट नाही. आता ! आता काय ,घाई करा लवकर., पळा . तसाच लगबगीने माणसांच्या गर्दीतून वाट काढत पळत निघालो ते थेट स्टेज वरती. लग्नाच्या शालू मध्ये नवरी खूप छान दिसत होती. पोहोचल्या पोहोचल्या ती जे गिफ्ट नवरदेव नवरीला भेट देणार होती कशाचाही जास्त विचार न करता त्या गिफ्ट ला मी सुध्दा हात लावला. आणि नवरदेव नवरीचा निरोप घेऊन तसाच खाली आलो. ती फक्त माझ्याकडे बघतच राहिली होती. जणू तिने मला ओळखलं असावं. मी सुद्धा हळू हळू पुढे चालत होतो. आणि तेवढ्यात तिचा आवाज आला., "ऋषि." असा. नाही हो असा आवाज नाही आला. तुमचे विचार माझ्याही पुढे जात आहेत . तीला माझं नाव कसं माहिती असणार. ए थांब एक मिन.
मला छान वाटलं
आणि भीतीही होतीच, हृदयाची धडधड माझ्या कानापर्यंत ऐकायला येत होती. ती
अजून जवळ आली तिच्या पायांचा चालण्याचा आवाज कानायच्या जवळ ऐकायला येत होता मी
डोळे बंद केले. आणि तिचा तो पायांचा आवाज थांबला. तसे मी डोळे हळू हळू उघडले.,ते तिचे डोळे समोरासमोर.ओठांवर हलकी लाल लिपस्टिक, तशीच केसांची ठेवणं, कपाळावर छोटीशी
टिकली आणि गळ्यात "मंगळसूत्र."
यावेळी
पहिल्यांदा माझा आशावाद चुकला होता. माणसाने वाट पाहावी पण जेवढी जास्त फक्त वाटच
पाहाल तेवढाच जास्त उशीर होतो. ती बोलायला लागली, तुझी हिम्मत कशी झाली येऊन माझ्या गिफ्ट ला हात लावायची
समजतोस कोण स्वतः ला.?
मी बोललो, ओळखलं नाहीस वाटते. जरा शांत हो. सांगतो. मी ऋषि.
आणि तिने माझं
नवं ऐकताच क्षणी मला मिठी मारली. मला समजलं नाही. पण मी खुश होतो कारण ती आज माझ्या
सोबत होती. ती खूप आनंदी वाटतं होती. तिच्या डोळ्यात हलकंस पाणी होत. तिला ही
तेवढाच जास्त आनंद झाला जेवढा मला तिला भेटून. त्या भरगच्च सभागृहात अगदी गर्दी
मध्ये तिने मला अशी मिठी मारावी!!
काही कळण्याच्या
आत तिने मिठी सैल केली. काही क्षण मी तिच्या नजरेत पाहतच राहिलो. ते आनंदाने
पाणावले होते.जस की ते ही या क्षणाची वाट पाहत होते.कदाचित त्यांनाही खूप काही
बोलायचं. ती तशीच शांत होती पण ते पाणावलेले डोळे.बरच काही बोलत होते. बहुदा सरते
शेवटी त्यांनाही हेच सांगायचं असावं की, आता खूप उशीर
झाला आहे. बराच वेळा नंतर तिने ते पाणावलेले डोळे पुसून घेतले. तेवढ्यात आई अशी
गोड हाक कानावर आली. ते तीच गोंडस लेकरू होत. तिने त्याची आणि माझी ओळख , हा बघ हा माझा लहानपणीचा शलेतील मित्र. अशी करून दिली. आणि
त्या लेकराणे त्याला ती बोलेल समजलं अश्या पद्धतीने मान डोलावली. आणि तिने माझा.
निरोप घेतला. आणि मी माझ्या डोळ्यांनी काही बोलायच्या आधी त्यांना शांत केलं.
चेहऱ्यावरती एक smile आणि आता डोक्यात कोणतेही प्रश्न नव्हते. ते लग्न आणि
तो दिवस मला हे शिकवून गेला की आयुष्य कधीच कोणासाठी थांबत नसते. आपल्याला प्रतेक
क्षणांमधून काहीतरी शिकत पुढे जायला हवं असत. आणि जो क्षण आपल्या हातात असतो तो
क्षण तिथेच भरभरून जिवंतपणे जगायला हवा असतो. कारण आज जगलेला आनंदी दिवस, उद्याच्या सुंदर गोड आठवणी असतात.
ती...
|
ReplyForward |
No comments:
Post a Comment