“ गड्या आयुष्या खूप साध असतं . कधीकधी खूप रटाळ असतं, आयुष्याचा महोस्तव करता आला पाहिजे. श्वास घेणं आणि सोडणं ह्याला जगणं म्हणत नाहीत. प्रत्येक श्वास घेताना आसमंतातल्या सुगंधाचा प्रत्यय आला पाहीजे.”
परमेश्वराने प्रत्येक मानसाला एक स्वर देऊन पाठ्वले आहे . अंतर्मनातल्या वीणेवर तो सूर सतत वाजत राह्तॊ . बाहेरच्या गोंगाटाकडे थॊड दुर्लक्ष केलं म्हणजे तो सूर एकू येतो. तो सूर एकू आला म्हणजे जीवन महोस्तवासारखंच होतं.
माणूस स्वतः पासुन कधीच प्रारंभ करीत नाही आणि कधीकधी स्वतःच्याच विचारांनी त्याचं मन इतक व्यापलेलं असतं की समोरची वस्तू त्याला आहे तशी दिसत नाही. हे जर निर्जिव वस्तुंच्या बाबतीत घडतं तर चालत्या – बोलत्या माणसाचा तो कसा स्वीकार करील !
आपले मित्र , नातेवाईक , परिचित ह्यांच्याबाबत आपन हेच करतो . आपन त्यांना जे ओळखतो , ते त्यांच्या संदर्भात आपले जे विचार असतात ते आपण त्यांच्यावर प्रोजेक्ट करतॊ. आपले मित्र , नातेवाईक , परिचित ह्यांच्याबाबत आपन हेच करतो . आपन त्यांना जे ओळखतो , ते त्यांच्या संदर्भात आपले जे विचार असतात ते आपण त्यांच्यावर प्रोजेक्ट करतॊ.
No comments:
Post a Comment